Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu
google.com, pub-9879939600859029, DIRECT, f08c47fec0942fa0
| महाभारत १०० |
महाभारत १००
महाराज धृतराष्ट्रा आपल्या कक्षेत बसले आहेत नि त्यांच्या सोबत संजय बसला आहे , त्याना कुरुक्षेत्रावर काय
सुरू आहे हे जाणून घेण्याची फार उत्सुकता होती. म्हणून ते
संजयला म्हणाले ," हे संजय माझ्या पुत्रा मध्ये नि पांडुपुत्रा
मध्ये काय सुरू आहे ते पाहून मला सांग बरं." तेव्हा संजय
म्हणाले ," जशी आपली आज्ञा !" असे म्हणून संजय ने आपली दृष्टी करुक्षेत्राच्या दिशेकडे वळविली नि तिकडे
घडत असलेले दृश्य ते महाराज धृतराष्ट्रा ना सांगू लागले.
ते म्हणाले , " हे राजन दोन्ही कडील सैन्ये समोरासमोर
उभी आहे , युवराज दुर्योधन आपल्या हातातील गदा खाली
ठेवून रथातून खाली उतरला नि आचार्य द्रोण जवळ गेला.
पांडव सैन्याचे निरीक्षण केले नि मग आचार्य द्रोण ना उद्देशून
म्हणाला ," हे गुरुश्रेष्ठ समोर पहा पांडवांची सैन्या आता त्यांच्या सैन्येत मोठमोठे महावीर आहेत जसे की , प्रधान सेनापती धृष्टद्युम्न , द्रुपद , विराट, सात्त्यकी , कुंतीभोज,
अभिमन्यू , द्रौपदी चे पाच पुत्र नि पाच पांडव ,आणि इतर योद्धे, आणि दुसरीकडे , पितामहा भीष्म ,कुलगुरू कृपाचार्य, आचार्य द्रोण, अश्वत्थामा, शल्य , माझे शंभर बंधू आणि इतर अगणित योद्धे दोन्ही सैन्याचे मूल्यमापन केले तर आमच्या सैन्याच्या पुढे पांडव सैन्या एकदम शून्य आहे. असे म्हणून तो पुन्हा आपल्या रथावर आरूढ झाला. त्याच वेळी अंगराज कर्ण आपल्या शिबिरात इकडून तिकडे बेचैनी ने येरझाऱ्या घालत होते. मध्येच थांबले नि गंगापुत्र भीष्मांना उद्देशून म्हणाले ," पितामहा आपण माझ्यावर फार अन्याय केलाय परंतु तुम्ही अर्जुनचे प्राण वाचवू शकणार नाहीत." त्याच वेळी दुसरीकडे पांडव सैन्या मध्ये रथी महारथी कुरुक्षेत्रावर उपस्थित होते. अर्जुन कौरवांच्या सैन्याचे अवलोकन करत होता. तेव्हा वसुदेव कृष्ण अर्जुनला म्हणाले , " पार्थ काय पाहतो आहेस ?"
" पितामहा , मातामहा , गुरुजन , पुत्र , मित्र आणि संगीसंबंधी या सर्वांना मी पाहत आहे."
" त्याना काय पाहायचंय आणि त्याना आज प्रथमच पाहत
आहेस का ? "
" हां त्याना मी आज प्रथमच पाहत नाहीये."
" आणि हे पण तुला माहीत होते की हे सारे संगीसंबंधी
कुठं ना कुठं जरूर उभे असलेले दिसतील."
" हो खरंय. परंतु पाहणे आणि समजणे यात फरक नाहीये
का ? म्हणून केशव माझा रथ दोन्ही सैन्याच्या मधोमध घेऊन
चल म्हणजे मला दोन्ही सैन्याचे अवलोकन करता येईल."
" ठीक आहे पार्थ अवश्य घेऊन चलतो. परंतु ही गोष्ट शंक
वाजन्यापूर्वी का सुचली नाही तुला ?"
" शंक वाजल्यानंतर हे सिद्ध झाले की युध्द टळणार नाहीये. परंतु तरी सुध्दा एकवेळ मी त्या सर्वांना अगदी
जवळून पाहू इच्छितोय." ते ऐकून वसुदेव कृष्णा ने एकदम
स्मित हास्य केले नि रथ हाकलला. अर्जुनला पुढे जाताना
पाहून भीम उद्गारला ," आता हा अर्जुन कुठं चालला आहे ?"
" चिंता करू नकोस अनुज वसुदेव कृष्ण त्याच्या सोबत
आहेत ते त्याला विचलित होऊ देणार नाहीत." युधिष्ठिर उद्गारला. अर्जुनला एकट्यालाच पुढे येताना पाहून दुर्योधन
उद्गारला ," अरे , अर्जुन समजतो काय स्वतःला ? पितामहानी
त्यांच्या बंधूंचे वध करणार नाहीत म्हणून त्याची एवढी हिंम्मत
वाढली काय ? कौरव सैन्या मध्ये दुसरा कोणीच योध्दा नाहीये
का ? " तेव्हा गंगापुत्र भीष्म म्हणाले ," अरे अर्जुनला काय
झालं तो एकटाच का पुढे येत आहे ?"
" मला वाटतं तो फार गोंधळलेला दिसतोय."
" दुविधा मध्ये तर मी पडलोय की ज्याने एकट्याने विराट
युद्धात आम्हां साऱ्यांना पराजित केले. तो एकटाच पुढे का
येतोय ? त्याला विसर पडला की काय अजून युध्द आरंभ
होण्याचा शंक देखील वाजला नाहीये." असे म्हणून ते आपल्या धनुष्यावर बाण चढवितात. तेवढ्यात आचार्य द्रोण उद्गारले,
" वसुदेव ने रथ आता थांबविला आहे गंगापुत्र."
" पण हा काय प्रकार आहे ?" गंगापुत्र उद्गारले.
" हां पार्थ रथ रणभूमीच्या मधोमध आणला." वसुदेव कृष्ण उद्गारला. तसा अर्जुन म्हणाला ," ह्या दोन सैन्या नाहीत तर दोन महासागर आहेत." असे म्हणून तो आपल्या पितामहा कडे स्नेहपूर्ण नजरेने पाहतो तसे त्याला आपल्या बालपणातील एक प्रसंग आठवला. एके दिवशी अर्जुन ने भीमाच्या वाट्याची खीर खाल्ली होती म्हणून भीम रागावला नि त्याला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावला. अर्जुन समजला की हा आता आपल्याला मारणार म्हणून अर्जुन पळतच पितामहांच्या कुशीत शिरत म्हणाला ," तातश्री तातश्री भीम दादा मला मारत आहेत." तेव्हा भीम पितामहा जवळ अर्जुनची तक्रार करू लागला की अर्जुन माझ्या वाट्याची खीर खाल्ली. तेव्हा पितामहा त्याची समजूत काढत म्हणाले ," उद्या ना आपण भरपूर सारी खीर बनवू ! "असे म्हणून अर्जुन ला भीमाच्या मारापासून वाचविले. तेव्हा अर्जुन बोलला, " तातश्री मी तुमच्या पाशीच झोपू का ?" तेव्हा पितामहा म्हणाले," अरे वत्स तुला किती वेळा सांगितले की मी तुझा तात नाही तर तुझ्या तातश्रीचाही तात आहे. त्यानंतर असाच एक प्रसंग अर्जुनला आठवला. अर्जुन विजयी यात्रा वरून परतला होता. तेव्हा पितामहा खुश होऊन म्हणाले ," गळ्याला नाही लागणार का पुत्र ?" त्यावर अर्जुन म्हणाले ," मी आताच विजयी यात्रा वरून परतलो आहे, आणि माझ्या कपडयावर धूळ आहे त्या धुळीने आपले श्वेतवस्त्र खराब होतील. " त्यावर पितामहा म्हणाले ," माझे
श्वेतवस्त्र तर तुझ्या वस्त्रा वरील धुळीने माखून घेण्यासाठी
सदैव व्याकुळ असतात पुत्र ." असे म्हणताच अर्जुन ने त्याना कडकडून मिठी मारली. त्यानंतर अर्जुन ची नजर आचार्य
द्रोण जाताच बालपणीचा एक प्रसंग आठवला. आचार्य द्रोण
यांनी गुरुकुलातील सर्व शिष्यांना क्रीडा करायला सांगून
गुपचूप फक्त आपल्या पुत्राला अर्थात अश्वत्थामालाच
चक्रव्यूहाचे भेदन कसे केले जाते ते शिकवीत होते. परंतु अर्जुनची नजर त्यांच्या वर पडताच खेळायचे सोडून अर्जुन आचार्य द्रोण पाशी गेला तेव्हा त्याला पाहून आचार्य द्रोण ने विचारले,
" तुझे खेळात मन रमत नाहीये का ?" तेव्हा अर्जुन उद्गारला, " गुरुदेव जेव्हा शिकवीत असतील ती वेळ खेळण्याची असूच शकत नाहीये." त्यावर आचार्य म्हणाले ," मला वाटतं की तू माझ्याकडून शिकायचे काहीच शिल्लक ठेवणार नाहीयेस." असाच अजून एक प्रसंग आठवला. अर्जुन रात्रीचा एकटाच शरसंधान चा सराव करत असतानाच तेथे आचार्य द्रोण आले आणि त्यांनी पाहिले की अर्जुन मोठ्या एकाग्रतेने शरसंधान करत असल्याचे पाहून त्यांनी म्हटलं , अरे वत्स हा तर धडा मी तुला शिकविलाच नाहीये." त्यावर अर्जुन उत्तरला," आपणच शिकविलात गुरुदेव. त्याचा मी अभ्यास करतोय." अर्जुनची विद्या शिकण्याची गोडी पाहून आणि अर्जुनचे नम्रतापूर्वक हे उत्तर ऐकून ते फार प्रसन्न झाले.
" पार्थ असा कितीवेळ पाहत राहणार आहेस त्यांच्याकडे ?"
" केशव मला एकवेळ पाहू दे त्याना. कोणास ठाऊक
युध्दा नंतर ह्या मधले कोण पुन्हा पाहायला मिळतील ? किंवा मिळणार ही नाहीत. गंगापुत्र भीष्म असतील जगासाठी
पण माझ्यासाठी तर माझे ते पितामहा आहेत ? त्यांचे माझ्यावर प्रेम इतके आहे की कित्येक वेळा माझे वस्त्र धुळीत माखलेले असायचे , परंतु तरी देखील मी त्यांच्या
कुशीत शिरत असे .परंतु त्यांनी मला आपल्या पासून कधीच दूर लोटले नाहीये.आचार्य द्रोण ह्यांची तर माझ्यावर एवढी कृपादृष्टी होती की त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलाला सुध्दा संपूर्ण अस्त्र विद्या ज्ञान दिलं नाही तेवढं ज्ञान मला त्यांनी दिलं. अश्या पूजनीय व्यक्तीवर मी बाण कसा चालविणार नि त्यांचा वध कसा करणार केशव ? माझ्या सारे अंग तर
थर थर कापू लागलंय जसं शिशिर ऋतूत थंडी ने गोठते
अगदी तसेच झाले आहे. मला माझे धनुष्य पण हातात धरवत नाहीये केशव. मग मी त्यांच्यावर बाण कसा चालविणार ? आणि हे सर्वजण माझे संगीसंबंधी आहेत. एकाच वंशातले आम्ही आहोत. ह्या सर्वांना मारण्याचे दुष्कर्म मी करू शकणार नाही केशवं . तू बोलत का नाहीस ?"
" आता तर मी फक्त ऐकतोय म्हणून तुला जे काय बोलायचे आहे ते बोलून टाक पार्थ ! मग मी बोलतो."
" त्यात बोलायचे काय आहे केशव ? जे सत्य आहे तेच
सांगतोय. माझ्या समोर जे युध्द करायला आलेत ते माझेच
तर सर्व नातेवाईक आहेत. कोणी भाऊ आहे तर कोणी आजोबा , तर कोणी माझे गुरुवर्य , कोणी मामाश्री पण आहेत. ह्यां सर्वांचा मी वध कसा करू ? आणि कशासाठी करू ? केवळ हस्तिनापूरचा राजमुकुट साठी... नकोय तो मला राजमुकुट. ज्यांनी मला बाण चालवायला शिकविले त्यांच्यावर मी बाण कसा चालवू ? नाही केशव नाही मला ते कदापि शक्य होणार नाहीये हे, शिवाय हे सारे कशासाठी करायचंय तर छोट्याश्या जमिनीच्या तुकड्यासाठी ! छे छे छे मला हे अजिबात पटतच नाहीये. मला मान्य आहे की दुर्योधनाने आमच्याशी कपट केलं. द्रौपदी चा अपमान केला. परंतु त्या बदल्यात त्याला मृत्यूदंड द्यायचा ! भाऊबंधकीचं नातं एकदम विसरून जायचं ? कसं शक्य आहे ? तो कसा असला तरी तो आमचा भाऊच आहे ना ? जेष्ठ पिताश्रीचा
जेष्ठ मुलगा ? त्याचा वध कसा करू मी ? केवळ हस्तिनापूरचा राजमुकुट मिळविण्यासाठी ! आणि हे राज्य तर पृथ्वीवरचेच आहेत ना ? परंतु ह्या राज्याच्या बदल्यात मला कोणी त्रैलोक्याचे राज्य देऊ केले ना ? तरी ते मी स्वीकारणार नाही. त्यापेक्षा शांती मार्ग अधिक चांगला केशव. मी हे युद्ध करणार नाही. नकोय मला हे सर्व ! त्यापेक्षा मी वनवास पत्करेंन केशव."
अर्जुन एकदम भावणावश झाला होता. तो आपला मान
अपमान सर्वकाही विसरला होता. तेव्हा त्याला वसुदेव समजावत म्हणाले ,
कश्मलमिदं विषमे समुपस्थितम।
अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन।
हे अर्जुन ! ह्या विपरीत स्थिती मध्ये तुझ्या मना मध्ये हे
अज्ञान कसे उत्पन्न झाले ? ते पण चारी बाजूनी विनाशाचे
ढगांनी तुला घेरले आहे धर्म रक्षा आणि विजयच्या आशेने
तुझ्याकडे पाहत आहे अश्या संकट काळात तू माघार घेत आहेस. हे तुझे आचरण मनुष्याला शोभणारे नाहीये. तुझ्या
अश्या वागण्याचे तुझ्या नावाला कलंक तर लागणारच आहे. शिवाय तुला स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होणार नाहीये.
क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥
भावार्थ : म्हणून हे अर्जुन ! तू नपुंसकता प्राप्त करू नकोस.
हे तुला शोभत नाहीये , हे शत्रुच्या दमनकर्ता! हृदयाच्या तुच्छ दुर्बलते चा त्याग कर युद्धासाठी उभा राहा.
अर्जुन उवाचकथं भीष्ममहं सङ्ख्ये द्रोणं च मधुसूदन ।।
इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥
भावार्थ : अर्जुन म्हणाला ," हे मधुसूदन ! हे शत्रुहन्ता ! मी युद्धभूमि मध्ये कोणत्या प्रकारे भीष्म पितामह आणि द्रोणाचार्य सारख्या पूज्यनीय व्यक्तिवर बाण कसे चालवू बरं ?"
गुरूनहत्वा हि महानुभावा-ञ्छ्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके।हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुंजीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् ॥
भावार्थ : ते असे महापुरुष आहेत की ते माझे गुरू आहेत,
ह्यांना मारून राज्य प्राप्त करण्यापेक्षा भीक मागणे परडवेल
मला. कारण गुरुजनाना मारून त्यांच्या रक्ताने माखलेले
सुख नकोय मला."
न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो-यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः ।यानेव हत्वा न जिजीविषाम-स्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ॥
भावार्थ : आम्हाला हे देखील माहीत नाही की युध्द करणे
योग्य आहे का न करणे योग्य आहे, आणि हे सुद्धा माहीत
नाही की युद्धात आम्ही जिंकू की ते जिंकतील ,धृतराष्ट्राचे पुत्र शत्रू बनून माझ्या समोर उभे आहेत त्याना मारल्याशिवाय मला विजय प्राप्त होणार नाहीये. परंतु त्यांचा वध करुन
आम्हाला सुख प्राप्त होईल का ? मला नाही वाटत त्यांचा
वध करून आम्हाला समाधान मिळेल असे. कारण ते माझे भाऊ नाहीत का ?"
" अवश्य आहेत."
" बस्स इतकेच ?"
" तू मला इतकेच विचारले होतेस पार्थ परंतु हे युद्ध संबंध
आणि नातीगोती स्थापित करण्यासाठी केले जात नाहीये पार्थ. आपल्या कर्तव्याला ओळख नि योग्य तो निर्णय घे.
कारण निर्णय पण तुलाच घ्यायचा आहे. तुला वाटत असेल
की युद्धाचा निर्णय मी घेऊ नि तू परिणामा पासून वाचशील.
तर असं कदापि होणार नाही. हे युद्ध पण तुझंच आहे नि
निर्णय पण तुलाच घ्यायचा आहे."
" कर्तव्याचा मार्ग दिसत नाहींये केशव म्हणून आपण
माझ्या आत्माचे पण सारथी बना. मला महितेय मी धर्म नि अधर्माच्या मध्ये उभा आहे, पण मला कळत नाहीये की धर्म कोणत्या बाजूला आहे नि अधर्म कोणत्या बाजूला ? म्हणून मला मार्गदर्शन करा केशव मार्गदर्शन करा. इंद्रियांना सुखविणारे शोका पासून मला वाचण्याचा मला मार्ग सांगा वसुदेव. मी अश्या मानसिक अवस्थे मध्ये युध्द नाही करू शकत गोविंद." असे बोलून अर्जुन गप्प झाला. संजय ने दिव्यदृष्टी ने पाहून महाराज धृतराष्ट्रा ने सांगितले की अर्जुन मी युध्द करू शकत नाही असे बोलून खाली बसला. तेव्हा महाराज धृतराष्ट्रा म्हणाले, " प्रिय अर्जुन ने तर योग्यच प्रश्न
विचारलेत संजय आपल्या पिताश्री नि गुरूवर कसे शस्त्र
उचलणार ? एका क्षत्रियाला शोभणार नाहीये कृत्य."
" महाराज त्याबद्दल काय सांगू शकतो बरं ? कारण मी
क्षत्रिय नाहीये ना ?"
" क्षत्रिय नसलास म्हणून काय झालं ? क्षत्रियां सारखा
विचार तर करू शकतोस....पण एक बरं झालं. प्रिय अर्जुन ने
युध्द करण्यास नकार दिला. याचा अर्थ आता युध्द होणार
नाही आणि ते आता इंद्रप्रस्थाची पण मागणी करणार नाहीत
नंतर मी दुर्योधन ची समजूत काढून प्रिय पांडवांना पाच गाव द्यायला राजी करीन. कारण युध्द तर आता होणारच नाही. जर अर्जुनच युध्द करणार नाही तर त्यांच्या कडे दुसरा आहे युध्द करायला ? हे संजय जरा पाहून सांग बरं वसुदेव काय देतो उत्तर देतो आहे त्याच्या प्रश्नांना ?"
क्रमशः
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा