Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

इमेज
  Vamana Hari Watmare         This is a very long year ago, there is a Konkan village, the village of the village is Tamhankar Wadi, the scenic village, and the Bils in the mountains, and the bay originated from the mountain, and the cake came from the village of Kharipatan and the end of Kharipaton. The end was going to the Arabian Sea than the ends. Tamhankar Wadi is situated in Kashi on the basis of Sahyadri Mountains, because the village's gate was in the gate of the village, this village has been a different importance. Fresh fish in the creek, the villagers get eaten every day. Coconut trees are also in the horticulture, according to the horticultural horticultural horticulture, even though the main business of the villagers are the major business of these villages, though the member of the villagers, the mangoes, the mangoes, which are in large custody, are the door of the mangoes.. Be. Tamhankar Wadi was living in the village of merciful and Damanti. Bec...

महाभारत ११८ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेन्द्रनाथ प्रभु.

महाभारत ११८
महाभारत ११८

 


                         महाभारत ११८

    
     अंगराज कर्णाने एवढे समजावून सांगितले की अर्जुन
आणि माझ्या मध्ये सूर्यदेव आले म्हणून मी बाण नाही सोडू
शकलो. पण तरी दुर्योधन आपल्याच मतावर अडून बसला.
म्हणाला ," ते काही असले तरी माझ्या हातून विजय निसटलाच ना ? हाती आलेला विजय तू घालविला. तुला चांगले माहीत आहे की मी इथं धर्म युध्द करायला नाही आलोय मला फक्त विजय प्राप्त करायचा आहे, ज्या प्रकारे साध्य करता येईल त्या प्रकारे साध्य करायचा बस्स ! मला पितामहांच्या आणि आचार्य द्रोणाचार्यांच्या निष्ठांवर कधी
भरवसा केला नाही. परंतु तुझ्या निष्ठेवर मला पूर्ण भरवसा
होता आणि तू सुध्दा त्यांच्या सारखा नियम पाळत बसलास !
मला हे अजिबात आवडलेले नाहीये." त्यावर  अंगराज कर्ण म्हणाला ," पितामहा आणि गुरू द्रोण माझ्या पेक्षा वयाने खूप मोठे आहेत. म्हणून त्यांच्याकडे सहन करण्याची क्षमता जास्त होती. परंतु माझ्या जवळ ती क्षमता नाहीये.आजपर्यंत तू पांडवां विरुध्द किती षड्यंत्र रचलीस पण एका षडयंत्रा मध्येही सफल झाला नाहीस. पण तरी देखील स्वतःला कधी दोष दिला नाहीस. परंतु माझ्या निष्ठेवर मात्र संदेह केलास."
    " तुझ्या निष्ठेवर मी संशय कधीच घेतलेला नाही मित्र !"
    " नाही कसा ? संशय जर घेतला नसतास तर तू आज असं
बोललासच नसतास.पण तुला काय माहीत मी एकटा आहे,
माझ्या सोबत कोणीही नाहीये. पण तुला मी एकच सांगतोय
की मी तुझ्या भात्यातील   एक बाण आहे, जिथं फेकशील तिथून तो आपल्या लक्षाकडेच जाईल. म्हणून विश्वास ठेव माझ्यावर. उद्याचे युध्द  इतिहास सदैव लक्षात ठेवील असेच
होईल." असे म्हणून कर्ण तेथून चालता झाला.
  
   अर्जुन द्रौपदी वर रागवत म्हणाला ," पांचाली, सारखं सारखं  आपल्या अपमानाचा विषय काढू नकोस. हे युद्ध
तुझ्या अपमाना पेक्षा फार मोठे आहे. समजून घेण्याचा जरा
प्रयत्न कर. या युद्धात आम्ही आमच्या पूर्वजांचे रक्त वाहवीत आहोत. तू या युद्धाला आपल्या अपमानाचा बदला समजण्याची चुकी करू नकोस पांचाली. मला माहित आहे की तुझे केश अतिसुंदर आहेत. परंतु हस्तिनापूर पेक्षा ना सुंदर आहेत  नाही मोठे आहेत,  म्हणून आपल्या केसांना लागलेले दु:शासनाचे रक्त धुवून टाक. रक्त नाडी मध्ये असते तेव्हा ते चांगले वाटते. परंतु तेच रक्त भूमीवर पडते. तेव्हा ते असाह्य होते."
    " म्हणजे माझ्या अपमानाला काहीच अर्थ नाही असं म्हणायचं का तुम्हांला ?"
   "  आहे, तुझ्या अपमानाला अर्थ आहे. परंतु तेवढा नाही
जेवढा तू समजतेस ! तू द्रौपदी आहेस हस्तिनापूर नाहीस. आणि हे बोलून मी तुझे महत्व कमी करत नाहीये प्रिये. तर मी  तुला समजविण्याचा प्रयत्न करत आहे की हस्तिनापूर एक सागर आहे आणि त्या सागरातील तू एक थेंब आहेस. तुझ्या विना सागर अधुरा आहे,परंतु आपला अपमान मध्ये आणून आपले महत्व कमी करू नकोस."
    " अर्थात आपण कर्ण वध करणार नाही तर  ?"
    " कर्ण वध कसा नाही करणार ? हस्तिनापूरच्या सुरक्षे साठी कर्ण वध आवश्यक आहे. परंतु तू केवळ द्रौपदी नाहीयेस तू हस्तिनापूरचा स्वाभिमान आहेस, वास्तविक
अपमान तुझा नाही झाला होता तर हस्तिनापूरचा झाला होता. तेव्हा तोच तोच विषय पुन्हा उगाळीत बसू नकोस. आता राहिला विषय कर्णाच्या वधाचा तर उद्याचा सूर्यास्त कर्ण पाहणार नाहीये."

     कर्ण आपल्या क्षयनगृहात झोपण्याचा प्रयत्न करत होता
पण त्याला झोप येत नव्हती. परंतु गुरू परशुरामनि दिलेल्या
शाप बद्दल विचार करता-करताच झोपला. आणि  कोणी
तरी म्हटले आहेच ना, मनी असे ते स्वप्नी दिसे. त्या प्रमाणे
कर्ण झोपे मध्येच बडबडत होता. फक्त उद्याच्या एक दिवसा
साठी गुरुदेव मला शाप मुक्त करा. तेव्हा त्याच्या स्वप्नात गुरुदेव परशुराम आले नि म्हणाले," उद्याच्या एका दिवसासाठी तर मी तुला शाप दिला होता. कारण मला माहित होतं पुढे काय होणार आहे ते. दुर्योधनाच्या पक्षातून तू लढणार  आहेस. हेही मला माहीत होतं , म्हणूनच मी तुला
तो शाप दिला."
    " गुरुवर्य मी त्याचा ऋणी आहे, म्हणून त्याच्या पक्षात
राहून मला युध्द करावेच लागणार नाहीतर मी त्याच्या ऋणातून मुक्त होणार नाहीये. माझी अडचण समजून घ्या."

    " अभिमन्यूच्या वधा मध्ये तू त्याच्या सोबत होतास नि
त्यात सामीलही झाला होतास अर्थात त्याच वेळी  त्याच्या ऋणातून तू  मुक्त झाला होतास आणि वासुदेव असताना तुझा विजय कदापि होणार नाहीये,आणि समज विजय झालाच तरी तुझ्या तो काही कामाचाही नाहीये, कारण तू कंगालच राहणार. आणि खरं सांगायचं तर उद्याच्या विजयावर पांडवांचा अधिकार आहे, आणि  तू दानवीर म्हणून  दान देण्यामध्ये प्रसिध्द आहेस दान घेण्यामध्ये नाहीये.
माझा आशीर्वाद घे नि उद्याचे अंतिम युध्द कर. वीरगतीला प्राप्त झालास तरी तुझा पराक्रम कोणीही नाकारणार नाहीये.
तुझे नाव सदैव महावीरांमध्ये घेतले जाईल." कर्णाने आपल्या
गुरुला प्रणाम केला. थोड्या वेळाने राजमाता कुंती त्याच्या
शिबीर मध्ये आल्या. आपल्या पुत्रांच्या जवळ येऊन त्याचे
मुखकमल न्याहाळीत असताना त्यांच्या डोळ्यात आलेले
अश्रू अंगराज कर्णाच्या चेहऱ्यावर पडताच कर्णाला जाग
आली त्याने डोळे उघडून आपल्या मातेकडे पाहत म्हटले,
    " आई , तू इथं का आलीस ?"
    " मी तुला भेटायला आली पुत्र."
    " आई ,मी  तुला दिलेले वचन माझ्या लक्षात आहे."
    " ते माहितेय मला. तू कधीच विसरणार नाहीस. परंतु मी
तुम्हां दोघांपैकी कोणासाठी ही रडू इच्छित नाहीये पुत्र."
    " असं कसं म्हणतेस आई , तू भरतवंशी ची कुलवधू आहेस. गांधारी मातेने तर आपल्या नव्यानव पुत्राची हस्तिनापूर साठी आहुती दिली आहे,तर तुझ्या ही एका पुत्राची द्यावीच लागेल ना आई ? नाहीतर उद्याचा इतिहास
तुला विचारील की हे कुंती तू हस्तिनापूरला काय दिलेस तर
तुला त्यांच्या पुढे लज्जित व्हायला लागेल नि ते मला
मान्य नाहीये. म्हणून  तुला ही आपल्या एक ना एक पुत्राची
आहुती द्यावीच लागेल." असे म्हणून अंगराज कर्णाने आपल्या मातेचे चरणस्पर्श केले. तेव्हा राजमाता कुंती
त्याला आशीर्वाद देत म्हणाल्या ," आयुष्यमान भव !"
    " नाही आई , हा आशीर्वाद तू अर्जुनाला दे . कारण अर्जुन
माझा छोटा भाऊ आहे, अर्थात ह्या आशीर्वादावर माझ्या
पेक्षा त्याचा अधिकार जास्त आहे." राजमाता कुंती ने स्नेहपूर्ण नजरे ने आपल्या पुत्राकडे पाहिले नि त्याच्या कपाळावर आपले ओठ ठेवले नि ममतेच्या मायेने त्याला आपल्या हृदयाशी धरले. त्यानंतर त्या  जड अंतकरणाने  तिकडून निघून गेल्या आणि कर्ण अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आपल्या मातेच्या पाठमोरी आकृतिकडे पाहतच राहिला.
राजमाता अंगराज कर्णानाच्या शिबिरातून ज्या निघाल्या त्या
थेट गंगापुत्र भीष्मांच्या शय्येवर झोपले आहेत तिकडे गेल्या.
त्यांच्या चरणावर आपले मस्तक ठेवताच त्यांनी आपली मान
वर करून  कुंती कडे पहात म्हणाले ," पुत्री कुंती माझ्या डोक्याजवळ ये कारण माझी नजर आता माझ्या पायापर्यंत पोहोचत नाहीये. तुझ्या पुत्राने आता माझी नजर मर्यादित
करून ठेवली आहे." त्यावर कुंती म्हणाली ," तातश्री मी आता काय करू ते मला सुचत नाहीये. इकडे आड नि तिकडे विहीर कोणत्या बाजूला जाऊ ते कळत नाहीये मला." त्यावर
गंगापुत्र भीष्म उद्गारले ," पुत्री तुला हा प्रश्न आज पडलाय
परंतु कित्येक वर्षा पासून मला हा प्रश्न पडलाय नि विचार करता करता सारे जीवन गेले. परंतु मोह मायातून बाहेर काही  पडू शकलो नाही मी ! परंतु सत्य हेच आहे की एकाचा पक्ष घेतला तर दुसऱ्याला त्यागावेच लागते. इथं बाणांच्या शय्येवर पडून दुसरं तर मी  काही करू शकत नाही. मग हाच विचार करतोय की जीवनात मी काय मिलविले नि काय गमविले. दुर्योधन तर आता इथं येत नाही. हां कर्ण आला होता. त्याच्या कडून समजले की आज दु:शासन वीरगतीला प्राप्त झाला. ज्या मुलांना मी अंगाखांद्यावर खेळविले ती सारी मुलं एक एक करून वीरगतीला प्राप्त होत आहेत. दु:शासन मध्ये एक दोष होता पुत्री दुर्योधनावर फार प्रेम करायचा. इतकं प्रेम त्याने इतके प्रेम दुर्योधनावर केलं की तो स्वतःचं  व्यक्तिमत्त्व तो विसरला नि दुर्योधनाची पडछाया बनून राहिला. जर असं नसतं तर त्याचे हात अगोदर द्रौपदीच्या केसापर्यंत नि नंतर द्रौपदीच्या वस्त्रा पर्यंत कधीच पोहोचले नसते. म्हणून त्याला माफ कर पुत्री. उद्या दोन महाविरा मध्ये होणार आहे युध्द त्यातला  एक वीरगतीला प्राप्त होणार आहे, तर विजयाची वरमाला गळ्यात घालणार. परंतु वीरगती प्राप्त झालेल्याचा पराक्रम त्यामुळे काही कमी तोला मोलाचा ठरत नाहीये. म्हणून जो हस्तिनापूरच्या हितासाठी युध्द लढणार आहे त्याचा विजय निश्चितच आहे आणि दोन्ही मुलं ही तुझीच आहेत. परंतु तुला आपल्या शिबिरात जाऊन
हस्तिनापूरच्या विजयासाठी पार्थना करावी लागेल पुत्री !"
राजमाता कुंती काही न बोलता तेथून जाऊ लागते. तशी
मागे फिरून म्हणाली,"तातश्री आपण फार भाग्यवान आहात
आपण कोणाची माता नाहीयेत. हे युध्द कोणात्याही हेतूने होत असले तरी वीरगती प्राप्त होणारी मुलं ही आमचीच आहेत तातश्री !" असे म्हणून राजमाता तेथून निघून गेली.

     अर्जुन झोपला नव्हता तर बाणाना धार लावत होता , तेव्हा तेथे नकुल आला नि म्हणाला ,आपण अजून झोपले
नाहीत मोठे दादा ?" अर्जुन ने नकुल कडे पाहत म्हटले," तू
पण तर झोपला नाहीस. ये बैस !" तेव्हा नकुल ने विचारले,
    " हे बाण तर उत्तम आहेत."
    " हां परंतु अंगराज कर्णासाठी उत्तम नाहीयेत.
    " तो सुतपुत्र तुझं काय वाकडं करणार आहे दादा ?"
    " हे बघ नकुल तो पुत्र कोणाचाही असो. पंरतु तो साधारण
वीर नाहीये. ज्या सैन्यांचा प्रधान सेनापती पितामहां , गुरू
द्रोण  सारखे महारथी राहिलेत. त्याच कुरुसैन्याचा प्रधान सेनापती म्हणून कर्णाची निवड होणे ही काही सामान्य गोष्ट नाहीये. त्यांच्या सैन्यात अजून भरपूर महारथी आहेत, जसे की गुरुपुत्र अश्वत्थामा, मद्र नरेश शल्य , कृतवर्मा , परंतु दुर्योधनाने त्यांची निवड प्रधान सेनापती साठी नाही केली.
शिवाय त्याच्या ध्वजाखाली इतर क्षत्रिय युध्द करायला तयार झाले. असा महावीर सामान्य असूच शकत नाहीये. अंगराज कर्ण पितामहा आणि आचार्य द्रोण अंगराज कर्णाचे गुरूबंधु सुध्दा आहेत , आणि त्याच्या कडे  परशुरामाचे विजयी धनुष्य जे त्याना स्वत: महादेवांची दिले होते . "
    " मला घाबरवीत आहेस दादा ?"
    " नाही नकुल मी तुला घाबरवीत नाहीये , जर युध्द जिंकायचे असेल तर प्रत्येक योद्धाला भयभीत असणे आवश्यक आहे , कारण भयभीत योध्दाच आपल्या प्रतिस्पर्धी पासून सावध राहू शकतो. आणि जो सावध राहणार नाही तो युध्द जिंकूच शकत नाहीये. नकुल मी पितामहांशी लढताना भयभीत नव्हतो, गुरू द्रोणांशीही युध्द करताना भयभीत नव्हतो. परंतु अंगराज कर्णाशी युध्द करताना मी भयभीत आहे. म्हणून त्याच्या सर्वोत्तम बाण
शोधून काढत आहे."

    अंगराज कर्ण आपल्या शिबिरात झोपला होता. परंतु झोपे
मध्येच बडबडत होता की हे ब्राम्हण जाणूनबुजून जर माझ्या
कडून हा अपराध घडला तर मी आपल्या दंडाला पात्र ठरलो असतो. परंतु हा अपराध नकळत घडलाय माझ्या कडून म्हणून मला क्षमा करा. वाटल्यास मी आपणास हजार
गाई देईन पण मला शाप देवू नका."
    " फार मोठा दानविर कर्ण ना तू मला हजार गाई  काय सहस्य गाई पण देशील. परंतु माझ्या गाईचे वासरू इथं मरून
पडलंय आणि तिथं माझी गाय आपल्या वासरासाठी हंबरत आहे,काय तू वासराला जीवनदान देवू शकतोस काय ?"
    " ते कसं शक्य आहे, मी ईश्वर नाहीये."
    " जर तू कुणाला  जीवनदान देऊ शकत नाहीस तर तुला कुणाचा प्राण घेण्याचा तुला काय अधिकार ? म्हणून मी तुला शाप देतो."
    " नका ब्राम्हंण देवता असं करू नका. त्यापेक्षा मला
दुसरा काहीही दंड करा."
    " तुझ्या सारख्या उन्मत शिकाऱ्याला हाच शाप योग्य
आहे, ज्या रथावर चढून तू ब्राम्हंणाशी उंच होतोस तोच रथ
तुला जेव्हा तू तुझ्या जीवनाचे महत्वपूर्ण युध्द करत असशील
तेव्हा तुझा रथ तुझा त्याग करेल. भूमी तुझ्या रथाचे गिळून
टाकेल. हाच तुला शाप आहे." तसा अंगराज कर्ण भयभीत होऊन उठला. तेवढ्यात एक द्वारपाल येऊन म्हणाला,
    " प्रधान सेनापतीचा विजय असो."
    " काय समाचार आहे ?"
   "  महाराणीचा संदेश आहे  की युध्द भूमीवर प्रस्थान
करण्यापूर्वी  महाराणी ना  भेटून जाणे, असा त्यांचा आदेश
आहे." अंगराज कर्ण तयार होऊन महारानी गांधारी ना भेटायला त्यांच्या शिबिरात गेला. तेव्हा दासीने महारानी ना
सूचना दिली की प्रधान सेनापती आपल्या दर्शनासाठी येत
आहेत." अंगराज कर्णाने जसा त्यांच्या शिबिरात प्रवेश केला
तसा त्याने महाराणी ना प्रणाम केला. तेव्हा महारानी" एकांत" म्हणाल्या. तश्या सर्व दासी तेथून बाहेर गेल्या. तेव्हा त्या म्हणाल्या ," राधेय आसन ग्रहण करा." कर्णाने आसन ग्रहण
केले नि म्हटलं ," महाराणी आज्ञा करा."
     " मी फक्त महारानी नाहीये. तुझ्या सर्वांत प्रिय मित्राची
मी माता सुध्दा आहे, म्हणून शक्य असेल तर थोड्या वेळासाठी मला महारानी न समजता फक्त आपली माता
समज." त्यावर कर्ण म्हणाला ," माता तर आहेतच आपण
जरी दुर्योधन माझा मित्र नसता तरी आपण माता आहेतच."
    " माझा प्रिय फक्त एकटा राहिला आता. म्हणून रागाच्या
भरात जर तुला तो वेडेवाकडे बोलला तरी त्याचा राग मानू
नकोस आणि त्याची अखेर पर्यंत सोडू नकोस."
    " ज्याच्या मुळे मला अंगराज हा सन्मान मिळाला त्याला
मी कदापि सोडू शकत नाही आणि  जिवंत असेपर्यंत दुर्योधनाच्या केसालाही धक्का लागणार नाही. परंतु मी वीरगतीला प्राप्त झाल्यानंतरचे मी काही सांगू शकत नाही."
    "  पण तू वीरगती प्राप्त होण्या विषयी का बोलतोस ?"
    " महारानी उद्या माझे नि अर्जुनाची निर्णायक  युध्द आहे.
युध्दा मध्ये काहीही होऊ शकते. पण आपल्याला एक विचारू ?"
    " जरूर विचार ?"
    " मी आणि अर्जुन.. ..आम्हां दोघांपैकी कोणाला जिवंत पाहू इच्छिता ?" कर्णाच्या या प्रश्नाचे उत्तर न देता त्या म्हणाल्या," मी अर्जुन आणि दुर्योधन दोघांनाही  जिवंत पाहू इच्छित आहे." त्यावर कर्ण उद्गारला , " ते शक्य नाहीये महारानी . परंतु माझा प्रश्न हा नव्हता. माझा प्रश्न होता की अर्जुन आणि मी या पैकी आपण कोणाला जिवंत पाहू इच्छिता ?" महारानी गांधारी कर्णाच्या ह्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकल्या नाही. त्या चूप झालेल्या पाहून अंगराज कर्ण म्हणाला,  " माझ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे कष्ट घेऊ नका. आणि मला आज्ञा द्या." असे म्हणून अंगराज कर्ण तेथून चालता झाला.
  
    युध्द सुरू झाले तेव्हा पांडव प्रधान सेनापती धृष्टद्युम्नाची
गाठ कुलगुरू कृपाचार्य यांच्याशी घडली. दोघांनी एकमेकांवर
अनेक शस्त्रांचा मारा केला. शेवटी कृपाचार्यांनी धृष्टद्युम्न ला
पूर्ण घायाळ करून टाकले. तर दुसरीकडे अंगराज कर्णाची
गाठ नकुलशी पडली. दोघांनी एकमेकावर शस्त्रांचा मारा केला. कर्णा पुढे त्याचे काय चालणार ? शेवटी परास्त करून
कर्ण त्याला म्हणाला ," आपल्या बरोबरीच्या योध्याशी युध्द
कर कुंती नंदन आता आपल्या शिबिरात जा नि आपल्या
जखमांवर स्नेहलेप लाव. असा स्नेहपूर्ण सल्ला देवून कर्ण
पुढे निघाला. तसे मद्र नरेश शल्याने विचारले ," नकुल
माझा भाच्या आहे म्हणून का त्याला जीवदान दिलेस ?
    " नाही मद्र नरेश नकुल माझ्या पेक्षा वयाने फार छोटा आहे
त्याला बंधुत्वाच्या नात्याने मी सल्ला दिला. परंतु तुम्हांला
नाही कळणार ते. जाऊ द्या. तुम्ही रथ पुढे घ्या. जसा त्याचा
रथ पुढे निघाला. तेव्हा त्याची नजर आपला मित्र दुर्योधन
आणि युधिष्ठिर यांचे युध्द असल्याने त्याने पाहिले. युधिष्ठिर
आपल्या बाणांनी दुर्योधनला झाकून टाकले होते. जागोजागी
जखमा झाल्या होत्या. ते पाहून अंगराज कर्ण आपल्या
मित्राच्या मदतीला धावून आला. युधिष्ठीर ने दुर्योधनांवर
सोडलेला बाण मध्येच बाण मारून तोडून टाकला. त्यानंतर
कर्ण आणि युधिष्ठीर या दोघांमध्ये युध्द सुरू झाले. नाराच,
सर्पमुख, कंकपुख ,जिद्म , सन्नतपर्व ,निशित , बस्तिक जे
हाताला लागतील ते बाण केवळ त्यांच्या शेपट्यांच्या निसटत्या स्पर्शाने अचूक ओळखुन आवश्यक तेवढे प्रभाव
देवून तो युधिष्ठीर वर बाण सोडू लागला. धुक्याच्या जाड
थरांनी जसे हिमालयाचे शिखर वेढून टाकतो. तसे युधिष्ठीरला
आपल्या बाणांनी झाकून टाकले. युधिष्ठिर एकदम हतबल
झाला. तलवार उचलली तर कर्णाने एक बाण मारून त्याची
तलवार पण खाली पाडली. शेवटी त्याच्या जवळ जाऊन
म्हणाला ,"  गुरू द्रोणानी दिलेली शस्त्रविद्या सुध्दा तू विसरलास ! म्हणून मला तुझ्याशी युध्द करण्यास अजिबात
रस नाहीये." असे म्हणून अंगराज कर्ण म्हणाला ," चला
मद्र नरेश रथ अर्जुनच्या रथाकडे घेऊन चला." अपमानीत
झालेला युधिष्ठीर आपल्या शिबिरात गेला. आपला भाऊ
शिबिरात गेलेला पाहून अर्जुन त्याला विचारण्यासाठी शिबिरात गेला असता युधिष्ठीर , अर्जुन वर चिडत म्हणाला,
    " तुला कर्णाचा वध करता येत नाहीये तर फेकून दे तुझं
ते गांडीव धनुष्य !" असे म्हणताच अर्जुन भयंकर चिडला.
कारण गांडीव फ़ेकून दे म्हणणाऱ्याला तो जिवंत सोडत नाही. परंतु इथं जेष्ठ भ्राताश्री असल्याने त्याला आपला
राग गिळावा लागला , आणि वासुदेव कृष्णा ने अर्जुनला शांत केले.तेव्हा अर्जुन म्हणाला ," आज चा सूर्यास्त अंगराज कर्ण
पाहणार नाहीये.असे म्हणून युधिष्ठीर च्या शिबिरातून बाहेर
पडला.तेवढ्यात त्याची गाठ अंगराज कर्णाशी पडली.
तसे दोघनचे द्वंद्वयुद्ध सुरू झाले. अर्जुनाने अग्नेयास्त्रापूर्वीचे सूचक मंत्र पुटपुटायला सुरुवात केली. एक प्रकारचे अतीव दिव्य तेज त्याच्या मुद्रेवर ओसडंताना दिसत होते. लालभडक पिसांचे भरगच्च तुरे माथ्यावर मिरविणारे
हजारो कारंडव पक्षी दृषद्वतीच्या पात्रावर एकदम झेपावेत
तसे अर्जुनाच्या गांडीव धनुष्यातून सुटलेले अगणित अग्निबाण वासुदेव कृष्णाच्या डोक्यावरून आग ओकत
फरफरत धावू लागले. सगळ्या आकाशमंडलाचे यज्ञकुंडच
झाले आहे की काय ? या भयाण कुरुसैनिक पळायला लागलं. अर्जुनाचे बाण अग्नीचा पाऊस पाडत होते.
    अर्जुनच्या अग्निबाणाचे निष्प्रभ करण्यासाठी कर्णाने
गुडघे टेकून वरुणास्त्राचे दिव्य मंत्र डोळे मिटून आळविले !
त्यांच्या ओंजळीतून अर्ध्यदान करताना पडलेले पाणीच
आज्ञाधारक सेवक म्हणून त्याच्या साह्यासाठी काळ्या मेघां
बरोबर विजांचं अनिर्बंध तांडवनृत्य घेऊन धावलं. गगनमंडळातील सभोवताली काळे ढग क्षणातच रणभूमीवर दाटले. गडगडाट मुसळधार पावसाचा वर्षाव करून त्यांनी
अर्जुनच्या अग्निबाणाने पेटविलेली आग पार विझवून टाकली. कर्णाच्या वरुणास्त्राचे वर्षणारे मेघ परतावेत म्हणून अर्जुनाने निवारक अशा वायव्यास्त्राची कुशल योजना केली. सुसाट , घोंगावत धावणाऱ्या वाऱ्याने  आकाश दाटलेली मेघांची  कोंडी उधळून लावली. कुरुक्षेत्र पुन्हा सूर्यकिरणांनी उजळून निघालं. अर्जुनाच्या  वाव्यास्त्रानं अनेक रथावरच्या
ध्वज पताका खेळणी म्हणून उडवून लावल्या. आनंदित झालेल्या अर्जुनाने वज्रास्त्राचं अभिमंत्रत करून हे असंख्य
तिक्ष्ण शस्त्र घेऊन धावणारे अस्त्र कर्णावर फेकलं.आपल्या दिशेने चित्रविचित्र आकाराची शस्त्र  गतीने येताहेत हे पाहून कणभरही विचलित न होता कर्णाने  त्याला प्रत्युत्तर म्हणून महेंद्र पर्वतावर प्राप्त केलेल्या भार्गवास्त्राची योजना केली. दोन्ही अस्त्रातील दिव्य आणि संहारक शस्त्र भयानक खणखणाट एकमेकांवर टक्करली. स्फुल्लिंग वर्षवून धर्तीवर निष्प्रभ होत कोसळली. पिनाक, पाश,तोमर,भिंदीपाल, चक्र ,त्रिशूल, अशी सर्व प्रकारची अस्त्रे त्यानी एकमेकांवर फेकली. कोणीही थकत नव्हता. युद्धाचा निकाल लागत नव्हता. तिसरा प्रहर संपवून सूर्य पश्चिमेकडे कलू लागला. इंद्र आणि बली, नाखूष आणि इंद्र ,जरासंध आणि भीम ह्या सर्वांहून त्यांचा संग्राम अति भयानक होता. चित्तथरारक होता ! क्षणाक्षणाला उग्र होत होता. कर्णाने सोडलेले काही बाण श्रीकृष्णाला लागले त्यामुळे श्रीकृष्णही जखमी झाला. हे जेव्हा अर्जुनाच्या रथावर बसलेल्या हनुमंताने पाहिले की आपल्या आराध्याला बाण लागलेले पाहून  हनुमंत चिडला नि रथावर उभा राहून मोठी गर्जना केली. हनुमंताची गर्जना ऐकून कुरुसैन्या पळू लागली. कर्णही घाबरला. कर्णाचा वध करण्यासाठी धावणार होता. परंतु वासुदेव कृष्णा ने त्याची समजूत काढली की हे त्रेतायुग नाहीये. हे द्वापर युग आहे. तेव्हा शांत हो." आपल्या आराध्याची आज्ञा म्हणून शांत झाला. त्यानंतर वासुदेव कृष्ण अर्जुनला म्हणाला," पार्थ दिव्य अस्त्र सोड. अर्जुनाने मंत्र म्हटले नि दिव्य अस्त्र प्रगट केलं. पण त्याच क्षणी धरतीने कर्णाचा रथ गिळला. पण तरी न डगमगता कर्णाने ब्रम्हंस्त्रा प्रगट करण्याचा प्रयत्न केला. परंतु मंत्र आठवेना. तेव्हा त्याला गुरू परशुरामानी दिलेल्या शापाची आठवण झाली. तू ब्राम्हंण नाहीस क्षत्रिय आहेस. कारण  ब्राम्हंणाकडे एवढी सहनशीलता असूच शकत नाहीस. म्हणून खोटे बोलून माझ्याकडून प्राप्त केलेली शस्त्रविद्या तुला जेव्हा त्याची जास्त गरज असेल तेव्हा तुझ्या ती कमी येणार नाहीये." तेव्हा अंगराज म्हणाला ," हे अर्जुन माझ्या रथांचा पाय जमीनीत शिरला आहे, तो आधी मला काढू दे." असे म्हणून कर्ण खाली उतरला. त्यानं आपला उजवा हात डाव्या रथचक्राच्या एका भक्कम आऱ्याला घालून ते उद्धारण्यासाठी सर्व सामर्थ्य एकवटलं ! त्याच्या दंडाचे भक्कम ,पिळदार, चिवट स्नायू टरारले ! ताणलेल्या कपाळावर घामाचे थेंबच थेंब दाटले ! एक दमदार झटका बसला ! पण रथचक्रं जागचे हलले नाही. खूप प्रयत्न केला. पण छे ! ब्राम्हंणाचा  शाप अखेर खरा ठरला होता. जणू सारे आजच्या दिवसाठीच होते.
      त्याला नि: शस्त्र पाहून मात्र अर्जुनाने आपले गांडीव धनुष्य ही खाली घेतले! नि: शस्त्रावर शस्त्र फेक कशी करायची म्हणून ! " वासुदेव कृष्ण म्हणाले ," पार्थ आता वाट
कुणाची पहातोस सोड बाण." त्यावर अर्जुन उद्गारला ," केशव
तो निःशस्त्र आहे ! पदस्थ आहे ! मी रथरुढ आहे !!अर्जुन
चाचरला. पुन्हा संभ्रमित झाला !" तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले,
   " पार्थ युध्दा मध्ये तर रथ तुटतच असतात. तो महावीर आहे दुसऱ्या रथात का जात नाहीये. त्याला काही आठवत नाहीये. तो फक्त बहाणा करतोय ." तेव्हा अर्जुनाने बाण धनुष्याला लावून प्रत्यंता खेचली मात्र कर्णाचा त्याच्या कडे लक्ष गेले तसा कर्ण म्हणाला," अर्जुन , थांब ! मी निःशस्त्र आहे ! पदस्थ आहे ! नि:शस्त्र पदस्थावर शस्त्र फेकणे हा युध्द धर्म नाहीये !! तू वीर आहेस ! क्षत्रिय आहेस ! " असे म्हणून त्याने ब्रम्हंस्त्रा आठवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला काही आठवेना ! "
     तसा अर्जुनाने आपले धनुष्य खाली घेतले. तेव्हा वासुदेव
कृष्ण म्हणाले ," धर्म ! राधेया , धर्माचा तुला अर्थ तरी माहीत
आहे काय ? सुतपुत्रा , कुरुंच्या प्राचीन सभागृहात पांचाली ला वारांगना म्हणताना तुझा धर्म कोठे गेला होता ? दुर्योधन च्या प्रत्येक षडयंत्रात तू सामील नव्हता काय ? तू  एकदा
तरी आपल्या मित्राला विरोध केलास काय ? सोळा वर्षाच्या
अभिमन्यू ला ह्या सातजणांनी घेरलात तेव्हा, तो पदस्थावरच
होता आणि निःशस्त्र ही होता. आता जो धर्म आठवला तो
धर्म त्यावेळी का आठवला नाही तुला ? अर्जुना ,वेध साधं !" वासुदेव कृष्णा ने आपली तर्जनी कर्णाच्या कंठाच्या दिशेनेच
अचूक रोखली ! तरीही तो हसला. त्याने दोन्ही हात जोडले.
परंतु कोणाला विनंती करण्यासाठी नाही तर केवळ वासुदेव
कृष्णाला वंदन करण्यासाठीच !! हे केवळ वासुदेव कृष्ण
जाणून होता. त्याचं रणांगणावरचं अंतिम वंदन  ! मूक , अबोल डोळ्यांतून ओंसडणारं. अंगराज कर्णाला सुतपुत्र
म्हणून संबोधले ते केवळ अर्जुनला त्यांनी केलेली कृत्ये
आठवावी म्हणूनच.
  अर्जुनला ते सारे दृश्य समोर दिसू लागले. मग अर्जुनाने
बाण सोडला. सुसाट निघालेला बाणाने त्याला  कंठस्नान
घातले. तो महारथी अंगराज  कर्ण रथचक्राजवळकोसळला ! विजय धनुष्य दूर उडालं. त्याचं अधरीय रथचक्र युध्दरण्याच्या झटापटीत  चिखलात माखून निघालं होतं. कर्ण गतप्राण झाला होता. ती वार्ता कोणालाच सत्य वाटत नव्हती. जो तो अवतीभवतीच्या योद्धाला विचारू लागला की काय झालं ? सर्वात प्रथम  अश्वत्थामा त्याच्या जवळ धावून आला. आणि
त्याचे धडा वेगळे आलेले मस्तक उचलून त्याच्या धडावर
लावले."

क्रमशः

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

Nagpur Violence LIVE: Nagpur Violence LIVE: Calling the Nagpur violence a "planned

महाभारत १३५ | Mahabharat part 135 | Author : Mahendranath prabhu.